सकाळ डिजिटल टीम
देशात आपल्या हटक्या चोऱ्यांमुळे कुख्यात झालेला बंटीला आता दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बंटीचा पोलीस शोध घेत होते. त्याच्यावर आतापर्यत तब्बल पाचशेहून अधिक चोरीचे आरोप आहेत.
बंटी हा नेहमीच रात्रीचे दोन ते सकाळचे सहा वाजण्याच्या दरम्यान चोरी करायचा.
बंटी चोरी करण्यापूर्वी ज्या घरात चोऱ्या करायचा त्या घरात घुसण्यापूर्वी खि़डकीचे ग्रिल तोडून जायचा. त्यानं खिडकी किंवा दार उघडण्यासाठी कोणत्याही अवजाराचा वापर केला नाही.
बंटी हा नेहमीच लक्झरी कार, ज्वेलरी, कटलरी, परदेशी घड्याळं आणि अँटीक फर्निचर सारख्या वस्तूंची चोरी करायचा.
बंटीनं ज्या वस्तूंची चोरी केली त्यामध्ये त्यानं कोणत्याही साध्या वस्तूंची चोरी केलेली नाही.
बंटीनं ज्या कारची चोरी केली त्यांचे लॉकही त्यानं कधी तोडले नाही. ती कारचे दरवाजे उघडण्यासाठी त्यानं घरातूनच चावीची चोरी केली.
बंटी जेव्हा केव्हा चोरी करण्यासाठी जायचा तेव्हा तो कार घेऊनच जात असे. ज्याठिकाणी चोरी करायचा तिथे तो त्याची जुनी कार ठेवून दुसरी कार घेऊन जात असे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.