Anuradha Vipat
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे
सुप्रिया पाठारेंने सुरुवातीच्या काळात फार संघर्ष करून चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया पाठारे यांनी आपला प्रवास व संघर्ष याबद्दल सांगितल आहे
सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “गरिबीतून श्रीमंतीकडे जाणं वेगळं पण, श्रीमंतीत असताना अचानक गरिबीचे दिवस येतात तेव्हा सगळ्या गोष्टी फारच त्रासदायक होतात.
सुप्रिया पुढे म्हणाल्या, या इंडस्ट्रीत यायचं वगैरे माझ्या काहीच डोक्यात नव्हतं. मला पोलीस अधिकारी वगैरे होण्याची इच्छा होती.
“शाळा संपल्यावर हळुहळू मी नाटकाकडे वळले तेव्हा मला प्रयोगासाठी पहिल्यांदा १५० रुपये मिळाले होते. ती माझी पहिली कमाई होती असंही सुप्रिया पुढे म्हणाल्या