बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजयी चौकार

Monika Lonkar –Kumbhar

सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत.

बारामती लोकसभा

सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यामुळे बारामती लोकसभा मतदार मतदारसंघाची लढत यावेळी अत्यंत चुरशीची झाली होती.

सुनेत्रा पवार

अजित पवार गटाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

बारामती

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच रिंगणात असल्याने अजित पवारांनी अगदी बारामतीच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला होता.

जनतेचा कौल

मात्र, बारामतीकरांनी अजितदादांना साथ न देता शरद पवारांना साथ दिल्याचे पहायला मिळाले.

विजयी घौडदौड

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी विजयी घौडदौड कायम राखली आहे.

शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची लेक खासदार सुप्रिया सुळेंनी यंदाच्या निवडणुकीत विजयी चौकार मारत बारामतीचा गड राखला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंचा विजयाचा डंका

Amol Kolhe | esakal
येथे क्लिक करा.