संतोष कानडे
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाणने अखेर ट्रॉफी जिंकलीच
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दुसऱ्या आठवड्यापासून सुरज चव्हाण खऱ्या अर्थाने खुलला
तेव्हापासूनच त्याने ट्रॉफी जिंकण्याचा निश्चय केला होता, अखेर त्याने ते खरं करुन दाखवलं
घरामध्ये असताना टीम बीमध्ये असलेला सुरज चव्हाण पॅडी, अंकिता आणि अभिजीतसोबत जास्त रमला
पॅडीने सुरजला मानसपुत्र म्हणून स्वीकारलं तर अंकिताने त्याला घर बांधून देण्याचा संकल्प केला
सुरजने घरावर बिग बॉसचं नाव टाकण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे
परंतु जान्हवी किल्लेकरने सुरजा एक सल्ला दिला, तू स्वतःच्या हिंमतीवर घर बांध!
''कुणाचेही उपकार घेऊ नकोस, उद्या कुणी म्हणू नये की, सुरजला मी घर बांधून दिलं''
असा सल्ला जान्हवीने दिला होता, तिने एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे