Anuradha Vipat
सूरज चव्हाणने त्याच्या अकाऊंटवरून अंकिता वालावलकर सोबतचे फोटो काढून टाकल्याने नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा होऊ लागली आहे.
त्यावर आता सूरजने प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित सूरजने या पोस्टद्वारे जाहीर माफी मागितली आहे
पोस्टमध्ये सुरजने म्हटलं आहे की, नमस्कार मी आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण.. माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही प्रॉब्लेम असल्यामुळे काही खूप महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत.
पुढे पोस्टमध्ये सुरजने म्हटलं आहे की, यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण होत्या. यापुढे मी स्वत: लक्ष देईन आणि काळजी घेईन.
तरीही आपणा कुणाचे मन दुखावली असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.
सूरज सोशल मिडीयावर सक्रिय असतो