Anuradha Vipat
'बिग बॉस मराठी'चा पुढचा भाग खूपच रंजक असणार आहे.
सूरज आणि पॅडी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसणार आहेत.
नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पॅडी दादा सूरजला म्हणत आहेत, पुढच्यावेळी नॉमिनेशनमध्ये मी तुला नॉमिनेट करणार आहे
त्यावर पॅडी दादांना उत्तर देत सूरज म्हणतो,तुम्ही काहीही करा..मी भीत नाही.
सूरज पुढे गंमतीत म्हणतो, मी तुमच्या पोटाच्या चकल्या करेल. तोंडावर बोट ठेवा आणि शांत बसा. एकही शब्द बोलू नका.
त्यावर पॅडी दादा सूरजला म्हणतात,तू किंग आहेस काहीही करू शकतोस.
या आठवड्यात सूरज चव्हाण नॉमिनेट झाला आहे.