धोनी अन् रैना १५ ऑगस्ट २०२० रोजी का निवृत्त झाले होते?

Pranali Kodre

एमएस धोनी आणि सुरेश रैना

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी ५ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यादिवशी भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन होता.

MS Dhoni - Suresh Raina | Sakal

मित्र

धोनी आणि रैना हे दोघेही मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत.

MS Dhoni - Suresh Raina | Sakal

निवृत्ती

पाच वर्षांपूर्वी धोनीने संध्याकाळी ७.२९ मिनिटांनी निवृत्तीची घोषणा केली होती, त्यानंतर लगेचच काही वेळात रैनाही निवृत्ती घेत असल्याचे सांगितले होते.

MS Dhoni - Suresh Raina | Sakal

कारण

याबाबत दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत रैनाने सांगितले होते की 'आम्ही आधीच १५ ऑगस्टला निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. धोनीचा जर्सी क्रमांक ७ आणि माझा ३. त्यामुळे हे दोन आकडे ७३ होतात आणि १५ ऑगस्ट २०२० रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे पूर्ण झाली होती, त्यामुळे यापेक्षा चांगला दिवस निवृत्तीसाठी नव्हता.'

Suresh Raina | Sakal

एकत्र क्रिकेट

धोनी आणि रैना यांनी एकत्र खूप क्रिकेट खेळले आहे. हे दोघे फक्त भारताकडूनच नाही, तर चेन्नई सुपर किंग्सकडूनही खेळले आहे.

MS Dhoni - Suresh Raina | Sakal

धोनीचे करियर

धोनीने ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना १६ शतके आणि १०८ अर्धशतकांसह १७२६६ धावा केल्या. त्याने कर्णधार म्हणून २००७ टी२० वर्ल्ड कप, २०११ वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

MS Dhoni | Sakal

रैनाचे करियर

सुरेश रैनाने ३२२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७९८८ धावा केल्या आहेत, ज्यात ७ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ६२ विकेट्सही घेतल्या आहेत.

Suresh Raina | Sakal

क्रिकेटमधील प्रसिद्ध Duck! ज्याने ब्रॅडमन यांची १००ची सरासरी हुकली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Don Bradman | Test Cricket | X/ICC
येथे क्लिक करा