सकाळ डिजिटल टीम
आजकाल जवळपास सर्वचजण आरोग्याची काळजी घेताना दिसतात. झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
त्यामुळे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे फळे, बीया आणि इतर पौष्टीक पदार्थ खात असतात. डॉक्टर आपल्याला चिया सीड्स खाण्याचा सल्ला देतात.
या सीड्स खाल्ल्याने अनेक समस्या दूर होतात. आपण आपल्या आहारात याचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
तुम्ही स्मूदी बनवू शकता. यासाठी तुमच्या आवडीची फळे, एक चमचा चिया सीड्स आणि दूध मिक्सरमध्ये टाका. नंतर बर्फ टाकून प्या.
एका वाटीत दही घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा चिया सीड्स मिसळा आणि 20 मिनिटे थंड ठिकाणी ठेवा. तुम्ही ते लस्सीमध्ये मिसळूनही पिऊ शकता.
रात्री ग्लास किंवा कपमध्ये दूध किंवा दही घ्या आणि त्यात एक ते दोन चमचे चिया सीड्स घाला. सकाळी तुमचा हेल्दी नाश्ता तयार आहे.
तुम्हाला शरीर थंड ठेवण्यासाठी शिकंजी प्यायला आवडत असेल तर एका ग्लासमध्ये एक चमचा चिया सीड्स घेऊन त्यात पाणी भरा.
आता लिंबाचा रस, काळे मीठ, थोडी साखर एकत्र करून प्या. त्यात तुम्ही पुदिनाही टाकू शकता.