Pranali Kodre
भारताचा मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव १४ सप्टेंबर रोजी त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
याच निमित्ताने त्याची पत्नी देविशा हिने एक स्पेशल पोस्ट केली आहे.
देविशाने ही पोस्ट करताना त्याचे काही खास फोटोही शेअर केले आहेत.
यातील काही फोटो त्याचे देविशासोबतचे रोमँटिक फोटो आहेत, तर काही एकट्याचे आहेत.
देविशाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझा बेस्ट फ्रेंड, लव्हर, माझं जग आणि माझ्या आयुष्यातील सर्वात्तम निर्णय ठरलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रत्येक दिवसासाठी मी कृतज्ञ असून तू माझ्यासाठी हे जग एक सुखद जागा बनवतोय आणि मी तुझ्याशिवाय काय केलं असतं माहित नाही, तुला खूप प्रेम.'
देविशाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सचा वर्षाव होत आहे.
सूर्यकुमारनेही पत्नीच्या या प्रेमळ पोस्टवर हसण्याची आणि हार्टची इमोजी कमेंट केली आहे.
सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०९ सामने खेळले असून ३२१३ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे.