Saisimran Ghashi
यंदाच्या ऑलम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.
तब्बल 72 वर्षानंतर महाराष्ट्रातील खेळाडू ऑलम्पिकमध्ये पदक मिळवू शकला आहे.
खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवणारा स्वप्निल हा कोल्हापूरचा दूसरा खेळाडू आहे.
रायफल शूटिंग प्रकारात ऑलिंपिक पदक जिंकणारा स्वप्निल पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
त्याने ऑलम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर त्याच्या इंस्टाग्राम,ट्विटरच्या फॉलोवर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
स्वप्निल त्याच्या लूक्समुळे देखील खूप चर्चेत आला आहे.त्याच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
स्वप्निलला 'नवा नॅशनल क्रश' असे देखील म्हटले जात आहे.
सोशलवर त्याच्या फोटोखाली नॅशनल क्रश,हिरो ऑफ इंडिया अशा कमेंट्स केल्या जात आहेत.
स्वप्निल कुसळे उद्या (बुधवार 21) कोल्हापूरमध्ये येणार आहे. त्याच्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.