Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेत्री व खासदार कंगना रणौतला काही दिवसांपूर्वी चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कानशिलात लगावली होती.
यावर आता स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.
स्वरा म्हणाली, कंगनाबरोबर जी घटना घडली, ती चुकीचीच होती, असंच कोणताही एक जबाबदार नागरिक म्हणेल.
स्वराच्या मते, कंगना यांच्याबरोबर जे घडलं ते चुकीचं होतं आणि ते घडायला नको होते.
कोणावरही हल्ला करणे योग्य नाही, असं ती यावेळी म्हणाली.
या घटनेनंतर लोक कंगनाच्या उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना सांगत होते की त्यांनी याबद्दल बोलू नये, कारण तेच लिंचिंगचं समर्थन करतात, असंही स्वराने म्हटलं आहे.
जे लोक या सगळ्या गोष्टी जस्टिफाय करत आहेत त्यांनी कंगनाच्या घटनेवरून तरी आम्हाला शिकवू नये,” असं स्वरा भास्कर म्हणाली.