Anuradha Vipat
स्वरा भास्करने 6 जानेवारी 2023 रोजी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले.
आता लग्नाला 1 वर्षा झाल्यानंतर स्वराने तिची प्रेमकहाणी सांगितली आहे. स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती फहादसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत
फोटो पोस्ट करत स्वराने लिहिले, फहाद आणि मी घाईघाईत लग्न केले. पण त्याआधी आम्ही तीन वर्षे चांगले मित्र होतो. आमच्यात प्रेम कधी सुरू झालं ते आम्हालाही कळलं नाही.
स्वराने पुढे सांगितले की, तिच्या आणि फहादच्या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांना खूप धक्का बसला होता. पण स्वरा आणि फहादला त्यांच्या प्रेमावर विश्वास होता
स्वरा भास्करने गेल्या वर्षी फहाद अहमदसोबत स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले होते. लग्नानंतर महिनाभरातच ती गरोदर राहिली
स्वरा लवकरच मनीष किशोरच्या 'मिसेस फलानी' या चित्रपटात दिसणार आहे.