Anuradha Vipat
अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा अणूशक्ती नगर येथून उमेदवार म्हणून उभा होता.
मात्र या निवडणूकीत स्वरा भास्करच्या नवऱ्याचा म्हणजेच फहाद खानचा पराभव झाला आहे.
आता स्वराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन निवडणूक आयोगाला एक प्रश्न विचारला आहे.
स्वरा भास्करने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले आहे की, “मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम मशीन ९९% चार्ज कसे होऊ शकते?
पुढे स्वरा भास्करने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले आहे की, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. अणुशक्ती नगर विधानसभेत ९९% चार्ज मशीन उघडल्याबरोबर भाजप समर्थित राष्ट्रवादीला मते कशी मिळू लागली?
स्वरा भास्कर वीरे दि वेडिंग, सरभरी, रांझना, तनु वेड्स मनु, प्रेम रतन धन पायो यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली होती.
स्वरा भास्कर आता एका मुलीची आई देखील आहे.