आशुतोष मसगौंडे
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा आहेत. त्या भारतीय संसदेच्या सदस्या देखील आहेत.
स्वाती यांचा जन्म 26 डिसेंबर 1984 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात झाला. नुकतेच त्यांनी आरोप केले आहेत की, त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान आत्याचार झाले आहेत.
दिल्ली विद्यापीठात स्वाती यांनी पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्कमधून सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदविका मिळवली.
स्वाती मालीवाल यांनी जागोरी या गैर-सरकारी संस्थेसाठी इंटर्न म्हणून काम करून व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली. त्यानंतरच्या वर्षांत, त्यांनी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) साठी सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जुलै 2015 मध्ये स्वाती मालीवाल यांना दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षपदी नियुक्त केले.
जय हिंद फाउंडेशनची स्थापना सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मालीवाल यांचे पती नवीन जयहिंद यांनी केली होती, ते जय हिंद फाउंडेशनचे संस्थापक देखील आहेत.
स्वाती मालीवाल यांनी सामाजिक कार्य आणि वकिली क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे त्यांना मान्यता मिळाली आहे. फोर्ब्सने त्यांना 2017 मध्ये भारतातील महत्त्वाचे व्यक्तीमत्तव म्हणून मान्यता दिली आहे.
दरम्यान नुकतेच त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले आहे.