गरोदरपणात पायांना सूज येतेय? या घरगुती उपायांनी मिळेल आराम Pregnancy

Aishwarya Musale

पायांना सूज

गरोदरपण हे स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी एक आहे. याकाळात स्त्रियांच्या पोटात एक जीव वाढत असतो त्यामुळे स्त्रियांना यादरम्यान अनेक समस्या जाणवतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे पायांना सूज येणे.

Pregnancy | sakal

स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल

गरोदरपणादरम्यान स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होत असतात तेव्हा बहुतेक स्त्रियांच्या पायांना सूज येते.गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यात स्त्रियांच्या पायांना सूज येऊ शकते,

Pregnancy | sakal

मिठाचा वापर कमी करा

गरोदरपणात पायांना सूज येत असेल तर अन्नातील मिठाचे सेवन कमी करावे. मीठ हे शरीरात अतिरिक्त पाणी साठवते. मिठात सोडियम हा घटक असतो तेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यावर सूज येऊ शकते.

Pregnancy | sakal

पोटॅशियम असलेले पदार्थ खावा

पोटॅशियम हे सूज कमी करण्यासाठी मदत करते. केळी, नारळपाणी, संत्री, डाळिंब, दही, रताळे, पालक, बटाटा इत्यादी पदार्थ शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यात मदत करतात.

Pregnancy | sakal

कॉफीचे सेवन कमी करा

कॉफी ही गरोदर महिला आणि त्यांच्या बाळासाठी हानिकारक असते. कॉफीमुळे सतत लघवी होत असल्यामुळे शरीर लघवीच्या रुपात द्रव बाहेर टाकते.

Pregnancy | sakal

भरपूर पाण्याचे सेवन करा

गरोदरपणात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता भासते म्हणून द्रव जमा होत असते. अशावेळी तुम्ही भरपूर पाणी प्यालात तर डिहायड्रेशन होणार नाही.

Pregnancy | sakal

एप्सम सॉल्टच्या पाण्यात पाय ठेवा

​गरोदरपणात पायाला सूज येत असेल तर तुम्ही एप्सम सॉल्टचा वापर करू शकता. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा एप्सम सॉल्ट टाका आणि साधारपणे २० ते २५ मिनिट पाय त्या पाण्यात ठेवा.

Pregnancy | sakal

पायाखाली उशीर घेऊन झोपणे

गरोदर महिलेच्या पायाला सूज येत असेल तर तिने झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपल्यास सूज उतरण्यास फायदा होईल.पायाखाली उशीर घेऊन झोपणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnancy | sakal