अनिरुद्ध संकपाळ
इंग्लंड विरूद्ध ओमान
इंग्लंडने टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये ओमानचा 101 चेंडू राखून पराभव केला. हा टी 20 वर्ल्डकप इतिहासातील सर्वाधिक चेंडू राखून केलेला पराभव ठरला.
श्रीलंका विरूद्ध नेदरलँड्स
2014 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेने नेदरलँड्सचा 90 चेंडू राखून पराभव केला होता. हा सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध नामिबिया
2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा 86 चेंडू राखून पराभव केला होता. हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त चेंडू राखून मिळवलेला विजय ठरला.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध बांगलादेश
2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 86 चेंडू राखून पराभव केला होता. हा चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त चेंडू राखून मिळवलेला विजय ठरला.
भारत विरूद्ध स्कॉटलँड
2021 च्याच टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने स्कॉटलँडचा 81 चेंडू राखून पराभव केला. टी 20 वर्ल्डकप इतिहासात हा सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेल्या विजयात हा पाचव्या क्रमांकाचा विजय ठरला.