Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे ही स्पर्धा खेळवण्यात आली.
यंदा पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले होते.
आता २० संघांमधून स्पर्धेतील अंतिम 4 संघ मिळाले आहेत.भारत, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे चार संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत.
उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तौरोबाला होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 27 जून रोजी पहाटे 6 वाजता सुरू होणार आहे.
दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात गयानाला रंगेल. हा सामनाही २७ रोजीच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे.
उपांत्य फेरीत पोहचलेल्या चार संघांपैकी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आत्तापर्यंत अपराजित आहेत.
तसेच अफगाणिस्तानने ५ विजय आणि २ पराभव पाहिले आहेत, तर इंग्लंडने ४ विजय आणि २ पराभव स्विकारले, तर त्यांचा १ सामना पावसामुळे रद्द झाला.
उपांत्य फेरीत विजय मिळवलेले संघ २९ जून रोजी बार्बाडोसला अंतिम सामन्यात आमने-सामने येतील.