T20 World Cup : मोठमोठ्या दिग्गजांना जे जमलं नाही ते अर्शदीपनं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वात चांगली बॉलिंग फिगर

या यादीत सहाव्या स्थानावर प्रग्यान ओझा आहे. त्याने बांगलादेशविरूद्ध 2009 मध्ये 21 धावात 4 विकेट्स घेतल्या आहेत.

जहीर खान पाचव्या स्थानावर असून त्याने 2009 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये आयर्लंडविरूद्ध 19 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

त्या खालोखाल चौथ्या स्थानावर आरपी सिंग आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 2007 च्या वर्ल्डकपमध्ये 13 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

हरभजन सिंगने 2012 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्ध 12 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तो यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

आर अश्विनने 2014 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 11 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

अव्वल स्थानावर अर्शदीप सिंग असून त्याने यंदाच्या 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 9 धावात 4 विकेट्स घेतल्या.

सौरभ नेत्रावळकरने रचला इतिहास

येथे क्लिक करा