धनश्री भावसार-बगाडे
अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. ऑफीसमध्येही अनेकांच्या टेबलावर कॉफी मग दिसतात.
जोडिदारासोबत डेटवर जाण्याचा पहिला बहाणा हा कॉफीचाच असतो.
तुम्ही अनेकदा कॉफी प्यायली असेल पण कॉफी मग / कप पकडण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?
चला तर जाणून घेऊया कप पकडण्याची योग्य पद्धत काय? फॉलो करा या स्टेप्स
सगळ्यात पहिले आपली तर्जनी म्हणजे पहिलं बोट कपाच्या हँडलमध्ये घालावे.
मग हँडलला आपल्या अंगठ्याने पक्क पकडावे.
त्यानंतर उरलेले ३ बोटं फोल्ड करून आत वळवून घ्यावे.
त्यानंतर आपल्या हातात कप उचलून त्याची पोझीशन घड्याळात ३ वाजेच्या काट्यांप्रमाणे करावी.
यावरून तुम्हाला नक्कीच कॉफी मग पकडण्याची योग्य पद्धत समजलीच असेल.
जर कॉफी मग मोठा, जड असेल तर उर्वरीत ३ बोटांचा आधार त्याला द्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.