राहुल शेळके
देशात अनेक आलिशान हॉटेल्स आहेत. पण हेही खरं आहे की शहरात राहण्याचा मुद्दा असेल तर कोणाचीही पहिली पसंती पंचतारांकित हॉटेल्सला असते.
पण तुम्हाला माहित आहे का देशातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते आहे आणि ते कुठे आहे?
देशातील पहिले पंचतारांकित हॉटेल ताज हॉटेल मुंबई येथे आहे.
ताज हॉटेल बांधण्यासाठी 14 वर्षे लागली आणि शेवटी 1903 मध्ये ते लोकांसाठी खुले करण्यात आले.
गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असलेले हे हॉटेल मुंबईतील पर्यटन स्थळही मानले जाते.
मुंबईत येणाऱ्या लोकांची सहल ताज हॉटेल पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही.
आज तुम्हाला ताज हॉटेलमध्ये राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील.
1903 मध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी फक्त 6 रुपये मोजावे लागत होते.