सकाळ डिजिटल टीम
अनेक शतकांपासून उभा असलेला ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
भारतातील आग्रा शहरात हा ताजमहाल उभा आहे.
ज्यावेळी मुघलांचं राज्य होतं, त्यावेळी त्यांच्यासाठी ताजमहाल हा ऐश्वर्याचं प्रतीकही होता. कारण अगदी अकबरपासून औरंगजेबापर्यंतचे मुघल बादशाह आग्र्यामधूनच कारभार पाहायचे.
पण औरंगाजेबानंतर बलाढ्य मुघल साम्राज्याला तडा गेला. त्यातच १७ व्या शतकात महादजी शिंदे दिल्लीवर चाल करून गेले. त्यांनी तेथील सत्ता मिळवली.
त्यांनी नंतर आग्राही जिंकला आणि मग १७८५ पासून आग्रा शहरात मराठ्यांची सत्ता चालू झाली.
मात्र १७८८ साली इस्माईल बेगने आग्र्यावर हल्ला चढवला. त्याने यमुनेच्या किनाऱ्यावर तळ ठोकला होता आणि त्याने तोफेचा वापर करत आग्र्यावर हल्ला केला.
त्याच्या या हल्ल्यापासून वाचण्यासाठी घोड्यांना आसरा देणं गरजचेचं होतं. त्यावेळी ताजमहालमध्ये मराठा सैन्यानं आपलं घोडदळ ताजमहालमध्ये हालवलं. ताजमहलात असलेल्या बराकींना घोडे बांधण्यात आले होते.
नंतर १८ जून १७८८ मध्ये झालेल्या लढाईत मराठ्यांनी इस्माईल बेगच्या सैन्याचा पराभव केला. त्यामुळे आग्रापाठोपाठ मथुरा आणि वृंदावन हा प्रदेशही मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला होता.