पुजा बोनकिले
जर तुम्ही तुमच्या मुलाला एसी किंवा कूलरमध्ये झोपवत असाल, तर नेहमी लक्षात ठेवा की थेट हवा तुमच्या मुलांना लागू नये.
जर तुम्ही मुलाला एसी असलेल्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये नेत असाल, तर लगेच करू नका. आधी एसी बंद करा आणि शरीराला खोलीच्या तापमानावर आणा.
लहान मुलांना जास्तवेळ थंड तापमानात ठेवू नका. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्याचा धोका असू शकतो.
जर तुम्ही मुलांना एसी रूममध्ये झोपवत असाल, तर एसीचे तापमान २३ ते २६ दरम्यान ठेवा. यापेक्षा कमी तापमान असल्यास मूल आजारी पडू शकते.
तुम्ही मुलांना एसी किंवा कूलरमध्ये झोपवत असाल, तरी त्यांच्या अंगावर पांघरून ठेवावे.
थंडीमुळे तो थरथरत आहे का, हे पाहण्यासाठी वेळोवेळी बाळाची तपासणी करत रहावी.
मुलांना एसीमध्ये झोपवत असाल, तर त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो.
यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला वेळोवेळी मॉइश्चरायझर लावावे; तसेच मुलांना स्तनपान करीत राहावे.
जर तुमचे मूल आजारी असेल किंवा प्री-मॅच्युअर असेल, तर त्याला एसी किंवा कूलरध्ये झोपविण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.