Monika Lonkar –Kumbhar
उन्हाळ्यात उकाडा आणि उष्ण वारा यामुळे डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब यासारख्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते.
या दिवसांमध्ये आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य आहार घेणे आणि शरीर हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यायची? ते जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी शक्यतो घरातच राहा. उन्हाच्या वेळी घर किंवा ऑफिसच्या बाहेर जाणे टाळा.
उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि शरीरात डिहायड्रेशन होण्याची शक्यताही वाढते. अशा परिस्थितीत दररोज दोन-तीन लिटर पाणी प्यावे.
दिवसा बाहेर जाण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावा. शरीराच्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर सनस्क्रीन लावल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमचे संरक्षण होईल.
उन्हाळ्यात खूप घट्ट कपडे घालणे टाळावे. सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटनचे कपडे घाला. सैल आणि सुती कपडे परिधान केल्याने घाम लवकर सुकतो.
उन्हाळ्यात हिरव्या भाज्या, काकडी, टोमॅटो, पुदिना यांसारख्या भाज्यांचे सेवन करा. टरबूज, खरबूज, संत्री, डाळिंब यासारखी रसदार फळे खा. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी राखली जाईल आणि तुम्ही डिहायड्रेशनपासून सुरक्षित राहाल.