अभिनेत्रीची दृष्टी गेली... कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना टाळा या चूका

रोहित कणसे

जास्मिन भसीन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन हिच्याच्या डोळ्यातील कॉर्नियाला दुखापत झाली असून तिला दिसणंही बंद झालं आहे.

take these precautions while using contact lenses

काळजी घ्या

या अभिनेत्रीच्या डोळ्यांना झालेल्या इजेनंतर कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना काय काळजी घ्यावा हा मुद्दा चर्चेत आला आहे.

take these precautions while using contact lenses

डॉक्टर काय सांगतात

यादरम्यान मनोरमा नेत्रालय याच्या संस्थापक, संचालक आणि जेजे रुग्णालयाच्या माजी नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर रागिनी पारेख यांनी याबद्दल माहिती दिलीय.

take these precautions while using contact lenses

डोळे जाण्याची शक्यता

त्यांनी सांगितले की, कॉन्टॅक्ट लेन्सेस कॉर्नियाच्या जवळ असल्याने ते खूप काळजीपूर्वकरित्या वापरावे लागतात. कॉन्टॅक्ट लेन्सेस नीट वापरले नाही तर कॉर्नियाला इजा होऊन डोळे जाण्याची शक्यता असते.

take these precautions while using contact lenses

कॉर्नियाला जखम

कॉन्टॅक्ट लेन्सला चुकीचं सोल्युशन वापरल्याने कॉर्नियाला जखम होते.

take these precautions while using contact lenses

जास्त काळ वापरणे टाळा

अनेकदा एकमेकांचे कॉन्टॅक्ट लेंसेस वापरले जातात कलर लेंसेस वापरल्या जातात सोल्युशन बदललं जात नाही, ठराविक वेळ किंवा महिन्याभरापेक्षा जास्त कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्या जातात.

take these precautions while using contact lenses

असं कधीच करू नका

अनेक लोक कॉन्टॅक्ट लेंसेस घालून झोपतात तसं कधीच करू नये.

काळजी घेणं गरजेचं

लग्न समारंभात चष्मा घालायचा नाही म्हणून आपण कॉन्टॅक्ट लेंसेस घालतो, त्यात काही हरकत नसली तरी कॉन्टॅक्ट लेन्सेसची काळजी घेणं खूप गरजेच आहे.

take these precautions while using contact lenses

हात स्वच्छ धुवावेत

कॉन्टॅक्ट लेन्स घालताना हात स्वच्छ धुवावेत, तसेच एका ठराविक वेळापुरताच त्यांचा वापर करावा. ठराविक मुदतीनंतर जुने कॉन्टॅक्ट लेन्सेस बाद करून नवीन वापरावेत.

take these precautions while using contact lenses

काय करावं?

डॉक्टरांनी सुचवलेलं सोल्युशनच वापरावा आणि रोज कॉन्टॅक्ट लेन्सेस स्वच्छ करून त्या त्यांच्या केस मध्ये सुरक्षित ठेवाव्यात.

take these precautions while using contact lenses

केस सोबतच ठेवावी

कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी त्याची केस सोबतच ठेवावी कारण केस नसल्यास त्रास होत असताना देखील लोक कॉन्टॅक्ट लेन्स काढत नाहीत

take these precautions while using contact lenses

मेकअप टाळा

कॉन्टॅक्ट लेन्स चा वापर करताना मेकअप टाळला पाहिजे, कारण मेकअप डोळ्यात गेल्यास इन्फेक्शन चा धोका असतो.

take these precautions while using contact lenses

नियम पाळा

कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्याने सौंदर्य तर नक्कीच वाढतं मात्र डोळे देखील जाण्याचा धोका असतो, त्यामुळे नेत्र तज्ञांनी सांगितलेल्या नियमांचा काटेकोर पालन करावे.

take these precautions while using contact lenses

परिणीती चोप्राने पतीसाठी शेअर केली खास पोस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Chopra | esakal
येथे क्लिक करा