Anuradha Vipat
अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
तनिषा मुखर्जीचे बॉलिवूडमधील करिअर फ्लॉप ठरले. मात्र ती तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती.
आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत तनिषाने आपल्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे
तनिषा म्हणाली ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये उदय आणि माझी भेट झाली होती. आम्ही दोघे २ वर्षे एकत्र होतो आणि नंतर वेगळे झालो.
पुढे तनिषा म्हणाली की, ‘माझा एक बॉयफ्रेंड होता जो खूपच पॉजेसिव्ह होता. त्यामुळे मी त्याला सोडले.
याशिवाय तनिषाने असेही सांगितले की, तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी तिच्या नात्याबद्दल फारसे ओपन नाहीत.