सकाळ ऑनलाईन टीम
न्यू इयरसाठी तुम्ही हॉटेलसारखी चटपटीत कचोरी आता घरीच बनवू शकता. वाचा रेसिपी
ही कचोरी बनवण्यासाठी अर्धा कप सोललेले तुरीचे दाणे, अर्धा मोठा चमचा बडीसोप, चाट मसाला, आमचूर पावडर, साखर व ओवा, कोथिंबीर, एक चमचा धणे जिरे पावडर, छोटा चमचा हिंग, तेल, हळद.
कृती - प्रथम मैद्यात तेलाचे कडकडीत मोहन, ओवा व तेल घालावे.
नंतर थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे.
सोलेले तुरीचे दाणे वाटून जाडसर वाटून घ्यावेत. नंतर कडईत फोडणीचे तेल घालावे.
तेल गरम झाल्यानंतर त्यात हिरवी मिरची आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.
नंतर त्यात सगळी सामग्री टाकावी. एक वाफ आणावी.
नंतर मिश्रण कढईतून काढून थंड होऊ द्या. भिजलेल्या पिठाचे छोटे गोळे करावे.
प्रत्येक गोळ्याची जाडसर पाती करून त्यात थोडे थंड झालेले सारण भरून घ्यावेत.
नंतर गरम तेलात मंद आचेवर लालसर कचोऱ्या खरपून घ्याव्यात.
झाली तुमची गरमागरम कचोरी रेडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.