टाटांच्या 'या' शेअरने केली कमाल; 2 रुपयांवरून थेट पोहचला 90 रुपयांवर

राहुल शेळके

टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.

गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये टीटीएमएलचा शेअर 15 टक्क्यांहून अधिक वाढून 93.75 रुपयांवर पोहोचला.

गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 4400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

टीटीएमएलचे शेअर्स गेल्या 4 वर्षांत 2 रुपयांवरून 90 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 109.10 रुपये आहे. तर टीटीएमएल शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 65.29 रुपये आहे.

TTMLचे शेअर्स गेल्या 3 वर्षात 110% पेक्षा जास्त वाढले आहेत. TTML चे शेअर 16 जुलै 2021 रोजी 44.30 रुपयांवर होते.

18 जुलै 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 93.75 रुपयांवर पोहोचले आहेत. TTML चे शेअर्स 7 जानेवारी 2022 रोजी 264 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते.

गेल्या एका वर्षात, TTML शेअर्समध्ये 27% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 18 जुलै 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 93.75 रुपयांवर पोहोचले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

बीटचा ज्युस प्यायल्यास काय होते?

Sakal
येथे क्लिक करा