राहुल शेळके
मिठाच्या चवीपासून ते विमानापर्यंतचा प्रवास उपलब्ध करून देणारा टाटा हा केवळ ब्रँडच नाही तर विश्वासार्हतेचे प्रतीक बनला आहे.
आजच्याच दिवशी 70 वर्षांपूर्वी, टाटा समूहाने भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात आणखी एक मैलाचा दगड स्थापित केला.
1954 मध्ये टाटा मोटर्सने जगातला पहिला मेड-इन-इंडिया हेवी-ड्युटी ट्रक लाँच केला.
हा ट्रक दाखल होताच वाहतूक उद्योगाला नवी वाट दिसायला लागली. टाटाने तत्कालीन प्रसिद्ध जर्मन कंपनी डेमलर बेन्झच्या तांत्रिक सहकार्याने हा ट्रक तयार केला होता.
टाटाने सादर केलेल्या या ट्रकचे नाव 'टीएमबी 312' असे होते. स्वातंत्र्यानंतर अवघ्या 7 वर्षांनी एका भारतीय कंपनीने ही कामगिरी केली होती. ज्याच्या पायावर आज भारतीय व्यावसायिक वाहन उद्योग उभा आहे.
आज टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी ट्रक आणि बस निर्मिती कंपनी बनली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक नवीन मॉडेल्सचा समावेश आहे.
1969 मध्ये टेल्को ब्रँडने टाटा समूहाच्या अंतर्गत प्रवास सुरू केला. यानंतर टेल्कोने 1986 मध्ये व्यावसायिक वाहन टाटा 407 लाँच केले.
1998 मध्ये रतन टाटा यांनी भारतातील पहिली स्वदेशी कार टाटा इंडिका लाँच केली. या कारने कंपनीला कार उत्पादक म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली.