सकाळ डिजिटल टीम
लहान मुलांना वाचनाची सवय लावणे अतिशय महत्तवाचे आहे. वाचन व्यक्तींच्या आकलन क्षमतेला आणि देहबोलीला आकार देतात.
वाचन मुलांचे ज्ञान आणि कल्पनाशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे नवीन जगाशी ओळख होते.
वाचनामुळे मुलांना घर बसल्या संपूर्ण जग फिरता येते, तसेच नवीन लोक आणि साहसी अनुभव अनुभवता येतात.
वाचन मुलांना विचारशील व्यक्ती बनवते. पुस्तकांतून मिळालेले ज्ञान सशक्त मने तयार करते आणि सशक्त मन जगावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतात.
मुलांना कुठेही मनोरंजासाठी, शिकवणीसाठी पुस्तके विश्वासू साथीदार म्हणून तत्पर असतात.
जसे शारीरिक हालचालींमुळे शरीर सुधृढ राहते तसे वाचनामुळे विचार तीव्र होतात, स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदू सक्रिय व निरोगी राहतो.
मुले जेव्हा त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचतात, तेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा आनंद अनुभवत येतो.
पुस्तके तुम्हाला मोठा विचार करण्यास प्रशिक्षित करतात. जेव्हा मुले पुस्तके वाचतात, तेव्हा मनात असाधारण ठीकाणे आणि लोकांचे चित्र काढतात.