Kiran Mahanavar
आयपीएल 2024 नंतर टीम इंडियाचे खेळाडू टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळताना दिसणार आहेत.
अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा 1 जूनपासून खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी टीम इंडिया 21 मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होणार होती. त्याचवेळी प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या खेळाडूंना दुसऱ्या बॅचमध्ये जायचे होते.
26 मे रोजी आयपीएल फायनलमध्ये सहभागी होणारे खेळाडू नंतरच्या तारखेला रवाना होतील.
अशा परिस्थितीत सुरुवातीच्या बॅचसाठी काही खेळाडूंची नावे निश्चित झाली आहेत.
आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. या संघांमधून 5 खेळाडू प्लेऑफमध्ये खेळताना दिसणार आहेत.
यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज हे पाच खेळाडू सोडले तर बाकीचा संघ रवाना होणार आहे.
ज्यामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचा समावेश आहे.