Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाला ६ जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध टी२० मालिका खेळायची आहे.
५ सामन्यांच्या या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू २ जुलै रोजी भारतातून हरारे येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असल्याने या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
प्रिन्स या टोपन नावाने ओळखल्या जाणारा शुभमन गिल या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून रियान पराग, अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे अशा खेळाडूंना पहिल्यांदाच या मालिकेसाठी संधी मिळाली आहे.
तसेच भारतीय संघाचा प्रभारी प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणही झिम्बाब्वेला रवाना झाला आहे.
या मालिकेतील सामने जुलै महिन्यातील दिनांक 6, 7, 10, 13 आणि 14 या दिवशी टी20 सामने होणार आहेत.
हे सर्व सामने हरारेला होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता चालू होतील.