टीम इंडिया न्युयॉर्कमधील सलग 3 विजयांनंतर पोहचली फ्लोरिडाला

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२४

टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे करण्यात आले आहे.

Team India | X/BCCI

अमेरिका

भारतीय संघाचे पहिल्या फेरीतील सामने अमेरिकेत होत आहेत.

Team India | X/BCCI

न्युयॉर्क

पहिल्या फेरीतील पहिले तीन सामने भारताने न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवत सुपर-८ फेरीत प्रवेश मिळवला.

Team India | X/BCCI

पहिल्या फेरीतील अखेरचा सामना

यानंतर आता पहिल्या फेरीतील अखेरचा सामना भारतीय संघाला कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामधील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणार आहे.

Team India | X/BCCI

फ्लोरिडा

त्यासाठी भारतीय संघ १३ जून रोजी फ्लोरिडाला पोहचला आहे.

Team India | X/BCCI

वेळ

भारताला कॅनडाविरुद्ध फ्लोरिडाला १५ जून रोजी सामना खेळायचा आहे. हा सामना स्थानिकवेळेनुसार सकाळी १०.३० वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

Suyakumar Yadav | X/BCCI

आधीचे सामने

भारतीय संघाने यापूर्वी फ्लोरिडाला ८ टी२० सामने खेळले असून हे सर्व सामने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळले आहेत. यातील ५ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर २ सामने पराभूत झाले आहेत. १ सामना अनिर्णित राहिला होता.

Team India | X/BCCI

न्युयॉर्कमध्ये T20 World Cup खेळताना लागतेय संघांची 'कसोटी'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma | X/ICC
येथे क्लिक करा