Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान संघात गुरुवारी (20 जून) सुपर-8 सामना पार पडला.
बार्बाडोसला झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 47 धावांनी विजय मिळवला.
सामना सुरू झाल्यावर भारतीय संघातील खेळाडूंने आपल्या दंडावर काळ्या फिती बांधल्या असल्याचं दिसून आलं.
भारतीय संघाने या काळ्या फिती भारताचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी घातले होते.
याबाबत बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली होती.
भारत आणि कर्नाटकचे माजी खेळाडू डेव्हिड जॉन्सन यांचे 20 जून रोजी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आणि भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले.