नुसती हाणामारी! आयपीएल 2024 मध्ये कोणत्या संघाचं आहे रनरेट दणदणीत?

अनिरुद्ध संकपाळ

यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वच संघांनी फिअरलेस क्रिकेट खेळण्याची रणनिती अवलंबली. मात्र प्रत्येक संघाला यामध्ये यश आलं असं नाही.

आपण आयपीएलच्या 17 व्या हंगामात कोणत्या संघाने चांगल्या रनरेटने धावा केल्या हे पाहणार आहोत.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वात दमदार रनरेट हे कोलकाता नाईट रायडर्सचे राहिले आहे. त्यांनी 10.06 च्या रनरेटने 12 डावात 2389 धावा केल्या आहेत.

याच यादीत दुसऱ्या स्थानावर सनराईजर्स हैदराबाद आहे. त्यांनी 12 डावात 10.05 च्या रनरेटने धावा केल्या आहेत.

आरसीबीने 13 सामन्यात 10.2 च्या रनरेटने 2540 धावा केल्या असून ते या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

चौथ्या स्थानावर 9.8 चे रनरेट राखत दिल्ली कॅपिटल्स विराजमान आहे. त्यांनी 14 सामन्यात 2573 धावा केल्या आहेत.

पाचव्या स्थानावर मुंबई इंडियन्स असून त्यांनी 9.6 च्या रनरेटने 13 डावात 2372 धावा केल्या आहेत.

एका IPL हंगामात कोणत्या अनकॅप्ट खेळाडूनं सर्वाधिक धावा केल्यात?

येथे क्लिक करा