कार्तिक पुजारी
२००६ मध्ये रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झालेल्या एका किशोरवयीन मुलाला कॅथोलिक चर्चचा संत म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
कार्लो एक्युटिस असं या मुलाचं नाव असून त्याचा जन्म १९९१ मध्ये लंडनमध्ये झाला होता. तो केवळ १५ वर्षे जगला
एक्युटिस याला खूप कमी वयात कॉम्प्युटरचे अफाट ज्ञान होते. त्यामुळेच त्याने मरण्यापूर्वी चर्चेच्या शिकवणीचा प्रचार करण्यासाठी वेबसाईट निर्माण केली होती
दोन चमत्कार केल्यानंतर आणि त्याला पोपची संमती मिळाल्यानंतर एखाद्याला कॅथोलिक संत म्हणून घोषित केले जाते.
एक्युटिस याने एकाला स्पर्श करून त्याचा रोग बरा केल्याचा दावा केला जातो.
दुसऱ्या एका प्रकरणात एक्युटिस याच्या समाधीवर जाऊन प्रार्थना केल्याने अपघातात गंभीर जखमी झालेला मुलगा बरा झाला असा दावा एका आईने केला होता
या दोन्ही चमत्कारांना पोप फ्रान्सिस यांची मान्य दिली होती. त्यामुळे एक्युटिस हा मृत्यूनंतर संत पदासाठी पात्र ठरला होता