सकाळ डिजिटल टीम
Telugu Actress Aarthi Agarwal : वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आरती अग्रवालला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीनं 2001 मध्ये 'पागलपन' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आणि त्याच वर्षी तिनं 'नुव्वू नाकू नचाव' या चित्रपटाद्वारे साऊथ चित्रपटांमध्येही पदार्पण केलं.
चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, रवी तेजा, ज्युनियर एनटीआर, प्रभास यांसारख्या साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांसोबतही तिनं काम केलं. अभिनेत्रीनं तिच्या करिअरमध्ये हिंदी, तेलुगू आणि तामिळसह 25 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तुम्हाला माहीत आहे का? अभिनेत्रीचे चित्रपटांमध्ये करिअर हिट झाल्यानंतर तिच्या आयुष्यात अशी एक वेळ आली की, तिला इंडस्ट्रीत काम मिळणं पूर्णपणे बंद झालं. त्यानंतर वयाच्या 31 व्या वर्षी तिचं निधन झालं.
अभिनेत्री तिच्या लठ्ठपणाच्या आजारानं त्रस्त होती. आरती अग्रवालनं तिचं सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी लायपोसक्शन सर्जरी केली होती, जी तिच्यासाठी खूप वेदनादायक ठरली.
आरती अग्रवालवर लायपोसक्शन शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हा तिच्या शरीरातील चरबी कमी झाली होती. डॉक्टरांनीही तिला ही शस्त्रक्रिया करण्यास मनाई केली. मात्र, तिनं त्यांचं ऐकलं नाही आणि शस्त्रक्रिया करून घेतली.
या शस्त्रक्रियेनंतर तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अभिनेत्रीची प्रकृती खराब होऊ लागली, त्यानंतर तिला न्यू जर्सी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिचं ऑपरेशन होणार होतं. मात्र, आरतीचा अचानक मृत्यू झाला.