Pranali Kodre
दिग्गज टेनिस स्टार राफेल नदाल निवृत्त झाला. तो डेव्हिस कपमध्ये स्पेनसाठी खेळून १९ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाला.
नदाल टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक. त्याला लाल मातीचा बादशाह म्हणूनही ओळखलं जातं. यामागील कारण म्हणजे त्याने फ्रेंच ओपनमध्ये निर्विवाद वर्चस्व ठेवत १४ वेळा जिंकलेलं विजेतेपद
२००१ पासून नदाल प्रोफेशनल टेनिस खेळत होता. त्याने जवळपास २ दशके टेनिस कोर्ट गाजवले.
त्याच्या त्याच्या कारकिर्दीत २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदं आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक असं यश मिळवलं.
त्याच्या २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदामध्ये १४ फ्रेंच ओपन, चार अमेरिकन ओपन, दोन ऑस्ट्रेलियन ओपन आणि २ विम्बल्डन विजेतेपदांचा समावेश आहे.
त्याने एकेरीमध्ये एकूण ९२ एटीपी विजेतीपदं, तर दुहेरीत ११ एटीपी विजेतीपदं जिंकली. तो एकेरीत २०९ आठवडे अव्वल क्रमांकावरही राहिला.
नदालने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 134,946,100 डॉलर इतकी बक्षीस रक्कम (Prize Money) जिंकली आहे.
तो एटीपी टूर्सच्या इतिहासात नोवाक जोकोविचनंतर सर्वाधिक बक्षीस रक्कम मिळवणारा दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू आहे.
नदालने या बक्षीस रक्कमेशिवाय त्याच्या विविध एंडोर्समेंट डिल्समधून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.