Pranali Kodre
क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंना टोपन नाव मिळणे काही नवीन नाही.
अशाप्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून माजी कर्णधार एमएस धोनीा चाहत्यांनी थाला या नावाने प्रेमाने स्विकारले आहे. त्यामुळे अनेकदा धोनीला 'थाला' या टोपन नावानेही संबोधले जाते.
धोनीप्रमाणेच चेन्नई सुपर किंग्सकडून माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला 'चिन्ना थाला' असे टोपन नाव देण्यात आले आहे.
यानंतर आता आयपीएल २०२४ दरम्यान रविंद्र जडेजालाही चेन्नई सुपर किंग्सने हर्षा भोगले यांनी सुचवल्यानुसार 'क्रिकेट थलापती' हे टोपन नाव दिलंय.
मात्र या तिन्ही टोपननावांचे अर्थ माहित आहेत का? तर थाला म्हणजेच नेता किंवा बॉस.
चिन्ना थालाचा अर्थ उपनेता किंवा नेत्याच्या उजवा हात समजला जाणारा व्यक्ती.
थलापतीचा अर्थ होतो कमांडर किंवा सेनापती.