Monika Lonkar –Kumbhar
मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी.
जुई सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत सायलीच्या प्रमुख भूमिकेत काम करत असून ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
उत्तम अभिनय कौशल्यासोबतच जुई तिच्या फॅशन सेन्ससाठी खास करून ओळखली जाते.
जुईने नुकतेच लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच जुईच्या कानावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर, काही काळ विश्रांती घेतल्यानतंर, जुई पुन्हा कामाला लागली आहे.
या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जुईचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
मोकळे केस, मिनिमल मेकअप अन् लॉंग इअररिंग्समध्ये तिच रूप अगदी खुलून दिसतंय.
जुईचे हे सुंदर फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून, त्यांनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या फोटोंमध्ये जुई खूपच गोड दिसतेय. तिचा हा सोज्वळ अंदाज चाहत्यांना भुरळ घालतोय.