Monika Lonkar –Kumbhar
मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी.
स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत जुई प्रमुख भूमिकेत काम करतेय. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेत जुई सायलीच्या भूमिकेत काम करत असून तिच्यासोबत अभिनेता अमित भानुशाली हा अर्जुनच्या भूमिकेत काम करतोय.
नुकतेच स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार प्रवाह पुरस्कार पार पडले. या पुरस्कार सोहळ्याला जुईने या सुंदर जांभळ्या खणाच्या आऊटफीटमध्ये हजेरी लावली होती.
तिचा हा जांभळा खण अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला आहे.
नुकतेच तिने या आऊटफीटमधले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या इंडोवेस्टर्न आऊटफीटमध्ये जुई अप्रतिम दिसत आहे. यावर साजेशी ज्वेलरी, मेकअप आणि हेअरस्टाईल तिने केली आहे.
जुईचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.