Anuradha Vipat
मलायका आणि अर्जुन हे 2018 मध्ये एकमेकांना डेट करू लागले.
त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे.
आता एका कार्यक्रमात दोघांना पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना खात्री पटली आहे की त्यांचं ब्रेकअप झालं आहे.
अर्जुन आणि मलायकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
शुक्रवारी नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘इंडिया काऊचर वीक 2024’ या फॅशन शोला अर्जुन आणि मलायका पोहोचले होते.
अर्जुन आणि मलायका हे पहिल्याच रांगेत पण एकमेकांपासून दूर बसले होते.