Anuradha Vipat
नुकतीच आता सबा आझादने एक मुलाखत दिली आहे
या मुलाखतीमध्ये सबाने आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत.
आता सबा आझादच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
सबा आझादने मुलाखतीमध्ये म्हटले की, माझ्या पासपोर्टवर सबा ग्रेवाल हे नाव आहे. माझे वडील शीख वंशाचे आहेत आणि माझी आई मुस्लिम आहे.
पुढे सबा आझादने मुलाखतीमध्ये म्हटले की, हे असे असले तरीही त्या दोघांनीही कधीच धर्माचे पालन केले नाही किंवा माझ्यावर त्यांचे विचार लादले नाही.
पुढे सबा म्हणाली, मी नास्तिक आहे. आझाद हे माझ्या आजीचे आडनाव होते.
पुढे सबा म्हणाली की, मला त्याचा अर्थ आवडला. म्हणूनच मी माझ्या नावासमोर आझाद लावते.