Anuradha Vipat
अखेर ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू झालं आहे.
पत्रकार, मॉडेल, अभिनेत्री, युट्यूबर, रॅपर, कुस्तीपटू अशा सगळ्या क्षेत्रातील स्पर्धकांची ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री झाली आहे.
१७ वर्षांचा जुना नियम यंदाच्या पर्वाने तोडला आहे.
‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील स्पर्धकांना पर्सनल फोन वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
आतापर्यंतच्या कुठल्याही ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात फोन वापरण्याची परवानगी दिली गेली नव्हती
पण आता ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यादांचा स्पर्धकांना फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अभिनेते अनिल कपूर यांच्या होस्टिंगने 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाची जबरदस्त सुरुवात झाली आहे