Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून चौथ्या क्रमांकावर धनंजय पोवार एलिमिनेट झाला आहे
आता या सगळ्यानंतर धनंजयने आपली पहिली प्रतिक्रिया व्हिडीओ शेअर करत दिली आहे.
व्हिडीओ पोस्ट करत धनंजय म्हणाला की, तुम्ही ‘बिग बॉस’च्या सीझनमध्ये मला चौथ्या क्रमांकावर पोहोचवलं, त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले त्यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे.
पुढे धनंजय म्हणाला की, माझ्यावर लोक एवढं प्रेम करतील हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मी जो होतो, जसा होतो तसाच मी शोमध्ये सर्वांना दिसलो
पुढे धनंजय म्हणाला की, माझ्या भावना शोमध्ये देखील खरेपणाने मी व्यक्त केल्या आणि हा व्हिडीओ मी खास तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी शेअर करत आहे
पुढे धनंजय म्हणाला की, ट्रॉफी मिळाली नाही याची एक खंत आहे पण, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे वडिलांच्या नजरेत माझी किंमत खूप वाढली आहे.
पुढे धनंजय म्हणाला की, खरंच माझ्या जन्माचं सार्थक झालं आणि हे सार्थक मला आयुष्यभर जपावं लागेल. आय लव्ह यू महाराष्ट्र!