Anuradha Vipat
अभिनेत्री तापसी पन्नूने २३ मार्च रोजी बॉयफ्रेंड मॅथियस बो याच्याशी लग्न केलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.
लग्नाच्या वृत्तानंतर मॅथियसने पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे
या फोटोमध्ये तो रंग खेळल्याचं दिसतंय. त्याच्या चेहऱ्यावर गुलाल लागला असून त्याने ‘हॅप्पी होली’ असं लिहून पुढे तिरंग्याचा इमोजी पोस्ट केली आहे.
याशिवाय मॅथियसने तापसी व तिच्या मित्रांबरोबर धुलीवंदन साजरं केलं तोही एक फोटो समोर आला आहे.
तापसी व मॅथियस १० वर्षांपासून नात्यात होते. आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे असं म्हटलं जात आहे
पण अद्याप तापसी, मॅथियस किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही लग्नाची अधिकृत माहिती दिलेली नाही.