सकाळ वृत्तसेवा
अभिनेता रितेश देशमुखने होस्ट केलेला बिग बॉस मराठी सीझन 5 जुलैमध्ये कलर्स मराठीवर आला आणि तेव्हापासून शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या सीझनमध्ये 16 सेलिब्रिटींचा समावेश करण्यात आला होता.
अरबाज पटेल, पुरुषोत्तम पाटील, वैभव चव्हाण, निखिल दामले, आर्या जाधव, घनश्याम दरोडे आणि योगिता चव्हाण हे स्पर्धक घराबाहेर पडले आहेत.
शोमधील अनपेक्षित ट्विस्ट आणि रोमांचक आव्हानांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.
टीआरपीमध्ये 'बिग बॉस मराठी सीझन 5'ने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
पण तुम्हाला माहितेय का की या शोची कल्पना एका कादंबरीतून घेण्यात आली आहे.
जॉन डी मोल याने बिग ब्रदर नावाने हा शो सुरु केला होता. हिंदीमध्ये या शोचे नाव बिग बॉस असे ठेवण्यात आले.
जॉन डी मोलला या शोची कल्पना इंग्रजी लेखक जॉर्ज ऑरवेल यांच्या कादंबरीतून सुचली होती.
जॉर्ज ऑर्वेलने 1949 मध्ये लिहिलेली ‘नाइन्टीन एटी फोर’ ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली होती. या कादंबरीत बिग ब्रदर नावाचे पात्र होते. या पात्रामुळे जॉन डी मोलला या शोची कल्पना सुचला.