Anuradha Vipat
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंतरा-मल्हार जोडी
अंतरा-मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले आता आयुष्यभराचे जीवनसाथी झाले आहेत
३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
लग्नाच्या दोन महिन्यांनंतर योगिता आणि सौरभने स्वतःच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे.
ही आनंदाची बातमी सौरभने त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे.
अभिनेता सौरभ चौघुलेने नव्या घरात गृहप्रवेश करताचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये नव्या घराची नेमप्लेट पाहायला मिळत आहे. या नेमप्लेटमध्ये सौरभ आणि योगिता असं दोघांचं नाव लिहिलं आहे.