सकाळ डिजिटल टीम
रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये त्यांच्या गीतांजली काव्यसंग्रहासाठी साहित्याच्या नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा हा काव्यसंग्रह लंडन येथे प्रकाशित करण्यात आला होता.
डॉ. हरगोबिंद खुराणा
डॉ. हरगोबिंद खुराणा यांना १९६८मध्ये त्यांना वैद्यकीय विज्ञानातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती होते.
सीव्ही रामन
सीव्ही रामन यांना १९३०मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल मिळवला. त्याच्या रामन इफेक्ट (प्रकाशाचे परावर्तन) या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.
अमर्त्य सेन
अमर्त्य सेन यांना 1998मध्ये अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
मदर टेरेसा
मदर टेरेसा यांना १९७९मध्ये शांततेचा नोबेल देण्यात आला होता.
कैलाश सत्यर्थी
कैलाश सत्यर्थी यांना २०१४मध्ये शांततेचा नोबेल मिळाला होता. आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांना होणाऱ्या छळाविरुद्ध त्यांनी कार्य केलं.