सकाळ डिजिटल टीम
इस्रोकडे असणारे रॉकेट्स
भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेकडे चार प्रकारचे रॉकेट्स आहे. प्रत्येक रॉकेटचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या अंतराळ मोहीमेसाठी केला जातो.
एसएलव्ही (SLV)
एसएलव्ही म्हणजे स्मॉल लॉंच व्हेकल. लहान उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी या रॉकेटचा वापर केला जातो. या रॉकेटची उंची २२ ते २३ मीटर इतकी असते.
एएसएलव्ही (Augmented Satellite Launch vehicle)
१९७० आणि १९८०च्या दशकात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने या रॉकेट्सची निर्मीती केली होती. पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत हलक्या वजनाचे पेलोड्स सोडण्यासाठी या रॉकेट्सचा उपयोग केला जातो.
पीएसएलव्ही (Polar Satellite Launch Vehicle )
PSLV रॉकेट भारताच्या अनेक अंतराळ योजनांमध्ये वापरला गेला असून, जवळपास सर्व मोहीमेत यश मिळवलं आहे.
पीएसएलव्ही रॉकेटचा उपयोग पहिल्या चांद्रयान मोहीमेत आणि मंगलयान मोहीमेत झाला होता. यात भारताला यश आले होते.
जीएसएलव्ही (Geosynchronous Satellite Launch Vehicle)mk2
जीएसएलव्ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे असणाऱ्या रॉकेट्सपैकी सर्वाधिक लांब जाण्यासाठी वापरण्यात येणारे रॉकेट आहे. सर्वाधिक वजनाचे उपग्रह या रॉकेटच्या साहाय्याने कक्षेत स्थापित करता येऊ शकतात.
जीएसएलव्ही रॉकेट १८ मोहीमेत वापरल्या गेलं आहे. यापैकी ४ मोहीमेत या रॉकेटला अपयश आलंय.