Aishwarya Musale
जगातील कोणत्याही देशात गेलात तरी तिथे तुम्हाला ट्राफिक सिग्नल दिसतीलच. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि वाहन चालवताना शिस्त नेमून देण्यासाठी ट्राफिक सिग्नलचा वापर होतो.
जर कधी ट्राफिक सिग्नलमध्ये बिघाड झाला तर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. हे सगळं असलं तरी आज आम्ही तुम्हाला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत
ज्या देशात एकही ट्राफिक सिग्नल नाही. हा भारताच्याच बाजूचा देश आहे. तर जाणून घ्या या देशाबद्दल
आम्ही ज्या देशाबद्दल बोलतोय, त्या देशाचं नाव भूतान आहे. भूतान हा दक्षिण-पूर्व आशियातील पूर्व हिमालयात स्थित एक सुंदर देश आहे. भूतानला 'लँड ऑफ द थर्ड ड्रॅगन' म्हणूनही ओळखलं जातं.
या देशाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्यातील एक गोष्ट तेथील रस्त्यांशी संबंधित आहे. येथील रस्त्यांवर एकही ट्राफिक सिग्नल नाही.
भूतानमध्ये ट्राफिक सिग्नल तर नसतात, पण इथे कधी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही हे देखील तितकंच खरं.
येथील रस्ते अशा प्रकारे बांधण्यात आले आहेत की ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवणार नाही.
या देशातील रस्त्यांवर तुम्हाला ट्राफिक पोलीस उभे असलेले दिसतील, जे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू देत नाहीत आणि या देशात वाहतूक कोंडी होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.